२ पिस्टल आणि ३ जिवंत काडतुसासह एकाला अटक…
ठाणे – २ देशी बनावटीचे पिस्टल आणि ३ जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम पुनिया असे याचे नाव आहे.
मुंब्रा रेतीबंदर परिसरात एक इसम मोठ्या प्रमाणावर अवैध अग्नीशस्त्र, काडतुसे, गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून उत्तम पुनिया यास अटक केली तसेच त्याच्याकडून २ देशी बनावटीचे पिस्टल आणि ३ जिवंत काडतुसे असा एकूण १,११,५००/- रू कि. चा मुद्देमाल हस्तगत केला.
सदर यशस्वी कामगिरी आशुतोष डुबरे पोलीस आयुक्त, ठाणे शहर, चव्हाण सह पोलीस ठाणे शहर, विनायक देशमुख अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर, सुभाषचंद्र सुरसे पोलीस उप परि-१ ठाणे, उत्तम कोळेकर सहाय्यक पोलीस आयुक्त, कळवा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय दवणे, सपोनि अजय कुंभार, पोहवा महाले, पोना काटकर, पोशि रोशन कदम, पोशि विरकर, पोशि जाधव यांनी केली आहे.
दरम्यान, गुन्हयाचा पुढील तपास सपोनि अजय कुंभार हे करीत आहेत.