डोंबिवली

घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक; ४ गुन्हे उघडकीस…

डोंबिवली – घरफोडी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक करून, ४ गुन्हे उघडकीस आणेल आहेत.

चिंटू चौधरी निशाद आणि बबलू उर्फ राजेश बनारसी कहार असे या दोघांचे नाव आहे. मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यसाठी पोलीस तपास करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उत्तर प्रदेश येथे जाऊन दोघांना अटक करून ४ गुन्हे उघडकीस आणले तसेच त्यांच्याकडून ३२५.४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ०७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, असा एकूण २२,७७,८००/- रू. किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला.

सदरची कामगिरी यशस्वी कामगिरी दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण व सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि विजय कादवाने, पोनि (का व सु) राहुल मस्के, पोनि (गुन्हे) राम चोपडे, पोनि (प्रशासन) दत्तात्रय गुंड, सपोनि संपत फडोळ, सपोनि महेश राळेभात, सपोनि प्रशांत आआंधळे, सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहवा सुनिल पवार, पोहवा. संजु मासाळ, पोहवा. विकास माळी, पोहवा  शिरीष पाटील, पोहवा. राजेंद्र खिलारे, पोहवा दिपक गडगे, पोहवा. सोमनाच ठिकेकर, पोना गणेश भोईर, पोना. शांताराम कसबे, पोना प्रविण किनरे, पोना देवा पवार, पोना.येलप्पा पाटील, पोना अनिल घुगे, पोना हासे, पोना चिंतामण कातकडे, पोशि विजय आव्हाड, पोशि अशोक आहेर, पोशि महेंद्र मंजा, पोशि.नाना चव्हाण, पोशि. गणेश बडे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page