रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल…
पुणे – राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर या खडकवासाला परिसरातील आहेत. आज सकाळी त्या जवळच्या मतदान केंद्रावर पोहचल्या. मतदान सुरू होण्यापूर्वी त्यांनी औक्षणाचं ताट घेऊन मतदान केंद्रात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनची पूजा केली.
मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्याच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली. त्यानंतर चाकणकर यांच्याविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.