ठाणे
भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरण; माजी आमदार नरेंद्र पवारांना न्यायालयाचा दणका…

thane – भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा भिवंडी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. भिवंडीतील बापगाव फार्महाऊस सामूहिक अत्याचार प्रकरणात नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

एका महिलेने केलेल्या सामूहिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलीस शैलेश पाटील यांच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलीस आणि पीडिता यांचे म्हणणे ऐकल्यानंतर भिवंडी न्यायालयाने नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे आता नरेंद्र पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.



