मुंबई

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; आशियाई क्रीडा स्पर्धेत सोनम मस्करची उल्लेखनीय कामगिरी…

mumbai – कामगार क्रीडा भवनातील खेळाडू सोनम मस्कर हिने उल्लेखनीय कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जपानमधील आयची-नागोया येथे आयोजित २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल संघ प्रकारात भारताला रौप्य पदक मिळवून देण्यात सोनमने महत्वपूर्ण योगदान दिले. २० व्या आशियाई स्पर्धेतील १० मीटर एअर रायफल संघ प्रकारात भारताचे हे पहिले पदक ठरले आहे.

१० मीटर एअर रायफल संघ प्रकारात भारतीय संघाला मिळालेल्या एकूण १८९८.० गुणांपैकी सोनमने वैयक्तिक ६३४.१ गुण मिळवत सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

सोनम सध्या पश्चिम रेल्वेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असून तिचे वडील महानंद वितरक सहकारी पतसंस्था येथील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सोनमने दिल्ली, कोल्हापूरसह मुंबईत कामगार क्रीडा भवनाच्या शूटिंग रेंजमध्येदेखील सराव केला आहे.

मुंबई परिसरातील तसेच कामगार कुटुंबातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचवावे यासाठी मुंबई शहर जिल्हा नियोजन निधीतून या रेंजची उभारणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या रायफल शूटिंग रेंजचे व्यवस्थापन केले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page