ठाणे
लाच घेताना लिपिक एसीबीच्या जाळ्यात…

ठाणे – महानगरपालिकेच्या एका लिपिकास २० हजार रुपये लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी रंगेहात पकडले आहे. दृमील संजीव किणी असे याच लिपिकाचे नाव असून, ते नालासोपारा वसई विरार महानगरपालिकेतील प्रभाग समिती ई मध्ये लिपिक या पदावर कार्यरत आहेत.
दुकानाची घरपट्टी नावावर करून देण्यासाठी दृमील किणी यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती २०,०००/- रुपये लाच घेताना एसीबीने किणी यांना रंगेहात पकडले.