देश
गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ…

नवी दिल्ली – एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. हि वाढ आजपासून म्हणजेच १ डिसेंबर २०२३ पासून, करण्यात आली आहे. ही दरवाढ १९ किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस संदर्भात करण्यात आली आहे.
देशातील तेल विपणन कंपन्यांनी एलजीच्या किंमतीत तब्बल ४१ रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरांसाठी करण्यात आली आहे. यामुळे या वाढीव किंमतीनुसार दिल्लीत एका सिलेंडरची किंमत ही १७९६.५० रुपये झाली आहे. तर मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर हा १७४९ रुपयात मिळणार आहे.
दरम्यान, घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.