नवी मुंबई
महिला पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात…

नवी मुंबई – दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या उरण येथील महिला पोलीस उपनिरीक्षकला लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी रंगेहात पकडले. सिंधु तुकाराम मुंडे असे या महिला उपनिरीक्षकाचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या वडिलांविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सिंधु मुंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे ६०,०००/- रु लाचेच्या रक्कमेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती ५०,०००/- रु लाचेची रक्कम सिंधु मुंडे यांनी स्विकारली एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याविरुद्ध उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे.