dombivali : राज्य उत्पादन शुल्क विभागाचा काळा धंदा बंद होईल का?

dombivali – राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजे शासनाचा मोठा विभाग आणि या विभागातून शासनाला मोठा महसूल जमा होत असतो. पण ते केव्हा जेव्हा या विभागात सक्षम अधिकारी कार्यरत असतील तेव्हा. परंतु जेव्हा विभागातील अधिकारी, कर्मचारी हे जर स्वतःच्या महसुलात वाढ करत असतील तर त्याचा शासनाला काय फायदा होणार.
राज्य उत्पादन शुक्ल विभाग अंतर्गत असणारे डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखाली डोंबिवलीत अनेक अनधिकृत ढाबे चालू आहेत. आणि त्या ढाब्यांवरती विनापरवानगी राजरोजपणे दारूची विक्री केली जाते. तसेच पिली देखील जाते.
याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग, डोंबिवली कार्यालयाला आहे कि नाही? आणि जर याची माहिती त्यांना नसेल तर ती का नाही?
दरम्यान, सामाजिक भान ठेऊन लक्ष्मण हजारे आणि युवराज सुर्ले यांनी अनधिकृत ढाब्यांसंदर्भात स्थानिक कार्यालयात लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे. परंतु यावर अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कार्यालयाचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप काळे यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांना उत्तर देणे कठीण झाले आहे.
तसेच याबाबत एका कर्मचाऱ्याने ढाबे चालक गुंड प्रवृत्तीचे आहेत. आम्ही कशी कारवाई करणार असे म्हणाला. तसेच अधिकारी लोकांची चांगली चंगळ असते. आणि जिथे जाईल तिथे खाईल, पिईल आणि खिशात घालून येईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ आहे.
विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असणारे दिलीप काळे यांचे ढाबेवाल्यांशी काही साटेलोटे आहे असे दिसून येत आहे. म्हणूनच ठिकठिकाणी कोणालाही न जुमानता ढाबे जोरात चालू आहेत.


