ठाणे

महिलेचे मंगळसूत्र खेचून पळणाऱ्यास अटक… 

कल्याण – रेल्वे स्थानकात एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळणाऱ्या एका इसमास कल्याण GRP व RPF पोलिसांनी रंगेहात पकडले. रोशन नथू पाटील असे याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास एक महिला कुटुंबासह कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील मिडल ब्रिज वरून उतरत असताना रोशन नथू पाटील हा या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळत असताना ताबडतोब GRP व RPF पोलिसांनी रोशनला पकडले. आणि त्याच्याकडून १,५०,०००/-  रु. किंमतीचे १ सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले. तसेच कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करून रोशनला अटक केली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page