ठाणे
ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला…

ठाणे – नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनी येथील अमर टॉवर या ७ मजली इमारती मधील पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळून ३ जण जखमी झाल्याची घटना घडली.

या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १०१ चा स्लॅब कोसळला त्यावेळी त्यात ५ व्यक्ती अडकले. अडकलेल्या ५ व्यक्तींना पालिकेच्या पथकाने बाहेर काढले. मात्र यातील ३ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमर टॉवर या इमारतीचे बांधकाम २५ वर्षे जुने आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.