ठाणे
ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; पाईपलाईन फुटली…

मंगळवार सकाळी ९ वाजे पर्यंत पाणी पुरवठा राहणार बंद…
ठाणे – ठाणे शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मुंबई-नाशिक महामार्गालगत माणकोली पेट्रोलपंपाजवळ सोमवारी पहाटे ५ वाजता फुटली. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.

महापालिकेच्या जल विभागातर्फे या जल वाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुरुस्तीमुळे मंगळवार, स. ९ वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच, बुधवारपर्यंत पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.

नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.