मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या २२७ राहणार…

मुंबई – मुंबई महापालिकेच्या प्रभागांच्या संख्येबाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मुंबई महापालिकेतील प्रभागसंख्या २२७ च राहील असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या २३६ वरून २२७ करण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधातील दोन्ही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या.
याबाबत उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर व समीर देसाई यांनी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. मविआ सरकारने लोकसंख्या वाढीच्या अनुषंगाने मुंबईतील एकूण प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय घेत कायदादुरुस्ती केली होती. मात्र, शिंदे सरकारने वटहुकूम आणून आणि नंतर कायद्यात फेरदुरुस्ती करून ती संख्या पुन्हा २२७ केली. यावर मुंबई उच्च न्यायलयाने निकाल दिला असून २२७ आकडा कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे.