ठाणे
इराणी टोळीतील एकास अटक…

ठाणे – ठाणे परिसरात चैन / मंगळसूत्र यांची जबरी चोरी करणा-या इराणी टोळीतील एकास गुन्हे शाखा, वागळे युनिट- ५ यांनी अटक करून ८ गुन्हे उघडकीस आणले. सलमान उर्फ राजकपूर असदउल्ला इराणी असे याचे नाव आहे. चैन स्नॅचिंग गुन्हयाचा समांतर तपास करत असताना पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सलमान उर्फ राजकपूर असदउल्ला इराणी यास अटक केली.

सदर प्रकरणी कापुरबावडी, नौपाडा, कळवा पोलीस स्टेशन हद्दीतील चैन स्नॅचिंग चोरीचे एकूण ८ गुन्हे उघडकीस आले असून, एकूण ७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि मोटार सायकल असा एकूण ४,५०,०००/ रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.