ठाणे
घरफोडी करणाऱ्या सराईतास अटक…

कल्याण – कल्याण परिसरात दिवसा घरफोडी चोरी करणाऱ्या सराईतास खडकपाडा पोलिसांनी अटक करून ८ गुन्हे उघडकीस आणले.
खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहने परिसरात एका घरामध्ये चोरट्याने दिवसा घरफोडी चोरी करून सुमारे ३५ तोळे सोन्याची चोरी केली होती. सदर बाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून शहाड, कल्याण पश्चिम परिसरात सापळा रचून सदर इसमास अटक करून घरफोडीचे एकूण ८ गुन्हे उघडकीस आणले. तसेच ४७ तोळे (४७० ग्रॅम) सोन्याचे दागिने, १ लॅपटॉप, १ मोबाईल, २ घडयाळ हस्तगत करण्यात खडकपाडा पोलिसांना यश आले आहे.