घरफोडी करणारा गजाआड…
पालघर – घरफोडी करणाऱ्या एका इसमास स्थनिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला.
याबाबत वृत्त असे आहे कि, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातील सोन्याचे दागीने, चांदीचे पैजण व रोख रक्कम असा एकूण ४,२०,०००/- रु. किंमतीचे मुद्देमाल चोरी केला असल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून एका इसमास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरी गेलेले सोन्याचे दागीने, चांदीचे पैजण व रोख रक्कम असा एकूण ४,२०,०००/- रु. किंमतीचे मुद्देमाल जप्त केला. दरम्यान सदर इसमास पालघर, ठाणे, मुंबई व नाशिक या जिल्ह्यातून २ वर्षासाठी तडीपार केले असल्याची माहिती समोर आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.