ठाणे

चोरट्यास मुद्देमालासह अटक…

ठाणे – घरफोडी चोरी, मोटारसायकल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या सराईत इसमास नौपाडा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून एकूण ४,६६,५००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. अब्दुल समद नुरमोहम्मद सखानी असे याचे नाव आहे.

फिर्यादी झोपले असताना चोरट्याने घरात प्रवेश करून त्यांचे सुमारे १६,०००/- रु. किंमतीचे ४ मोबाईल फोन चोरी करून पळून गेला असल्याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मुंब्रा परिसरातून अब्दुल समद नुरमोहम्मद सखानी यास अटक केली. त्याच्याकडून ५ मोबाईल, १ लॅपटॉप, २ मोटारसायकल असा एकूण ४,६६,५००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून, नौपाडा पोलीस स्टेशनचे ४, कळवा पोलीस स्टेशन १ व ठाणेनगर पोलीस स्टेशन १ असे एकूण ६ गुन्हे उघडकी आणले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page