ठाणे
अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडले…

ठाणे – १५ हजारांची लाच घेताना एका अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी रंगेहात पकडले. रविंद्र जाधव असे या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याचे नाव असून, ते राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (MSDCL) वाशी (वर्ग 1) येथे कार्यरत आहेत.
तक्रारदार हे काम करत असलेल्या मीटर रिडींग, बिल प्रिंटींग व बिल वितरणाची कामाच्या थकीत देयकस समाधान कारक शेरा मारून ते पुढे पाठविण्याकरीता २०,०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५,०००/- रुपये लाच घेण्याचे मान्य करून रविंद्र जाधव यांना लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.