ठाणे
लाच मागणारा खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात…

ठाणे – लाच मागणाऱ्या एका खाजगी इसमास अँटी करप्शन ब्युरो, ठाणे विभागाने अटक केली आहे. हबीब इब्राहीम रेहमान असे याचे नाव आहे. २ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी एसीबीने त्याला ताब्यात घेतले.
तक्रारदार यांना त्यांच्या विरुद्ध मिरा रोड पोलीस ठाणे येथील दाखल गुन्ह्यात अटक न करण्याकरीता सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी व इतर लोकसेवक हे २,००,०००/- रु लाचेच्या रक्कमेची मागणी करत आहेत असे सांगून सदर खासगी इसम हबीब इब्राहीम रेहमान याने तक्रारदार यांच्याकडे २,००,०००/- रु लाच मागणी केल्याने सदर इसमास एसीबीने ताब्यात घेतले.