महाराष्ट्र न्यूज दिनदर्शिका २०२३ प्रकाशन सोहळा उत्साहात…

डोंबिवली – महाराष्ट्र न्यूज दिनदर्शिका २०२३ प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे डॉ. योगेश जोशी (कोमसाप कल्याण शाखा, अध्यक्ष) गणेश जाधव (एपीआय, राम नगर पोलीस ठाणे), हेमंत नेहते (कोमसाप कल्याण शाखा, कार्यवाह), डॉ.मनिलाल शिंपी (आर.एस.पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर, रस्ता सुरक्षा पथक व नागरी संरक्षण संघटन) यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
हा सोहळा खर्डीकर क्लासेस, २ रा मजला, डोंबिवली (पूर्व) याठिकाणी संपन्न झाला. सोहळ्याला युवराज सुर्ले (युवा सूत्र संपादक), सुनील खर्डीकर (खर्डीकर क्लासेस संचालक, महाराष्ट्र न्यूज, सल्लागार), राजेंद्र वखरे (क्राईम बॉर्डर संपादक), विशाल शेट्टे (सेफ्टी वेल्फेयर असोसिएशनचे अध्यक्ष), संकेत खर्डीकर (खर्डीकर क्लासेस), महेश काळे (महाराष्ट्र न्यूज, सल्लागार) नरेश ठक्कर (महाराष्ट्र न्यूज, सल्लागार), प्रविण बेटकर (विशेष प्रतिनिधी, क्राईम आळा)

अविनाश वाकचौरे (महाराष्ट्र न्यूज, सिनियर क्राईम रिपोर्टर), राजेश गायकवाड (महाराष्ट्र न्यूज, प्रतिनिधी), शरद महाबरे (कॅमेरामन, महाराष्ट्र न्यूज), भगवान मोरजकर, डॉ. किशोर पाटील (दैनिक स्वराज्य तोरण, संपादक) आणि इतर नागरिक उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन भगवान मोरजकर यांनी केले. तर अमृता पाटणकर यांनी आभार मानले.

महाराष्ट्र न्यूज गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असून, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा, गुन्हेगारी विश्वातील बातम्या प्रसारित करत आहेत. तसेच दिनदर्शिका, दिवाळी अंक, महिला दिन, लहान मुलांना खाऊ वाटप असे विवध उपक्रम राबवते. तसेच समाजात होणाऱ्या अन्यायाला वेळोवेळी वाचा फोडण्याचे काम देखील महाराष्ट्र न्यूज ने केले आहे.
