उल्हासनगर महापालिकेतील २ मुकादमांना लाच घेताना रंगेहात पकडले….

उल्हासनगर – उल्हासनगर महापालिकेतील २ मुकादमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी ४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. वसंत कृष्णा फुलोरे आणि बाजीराव दामोदर बनकर अशी या दोघांची नावे आहेत. प्रभाग समिती क्र. ३. उल्हासनगर महानगरपालिकेत कार्यरत आहेत.
यातील तक्रारदार हे राहत असलेल्या ठिकाणी त्यांचे नातेवाईकांचे घराचे दुरूस्तीचे काम करत असताना सदरचे काम उल्हासनगर प्रभाग समिती ३ च्या अंतर्गत येत असल्याने वसंत कृष्णा फुलोरे आणि बाजीराव दामोदर बनकर यांनी तक्रारदार यांना सदरचे काम सुरू ठेवायचे असल्यास ५०००/- रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने पडताळणी केली असता वसंत कृष्णा फुलोरे आणि बाजीराव दामोदर बनकर यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबी ठाणे युनीटने सापळा रचून वसंत कृष्णा फुलोरे व बाजीराव दामोदर बनकर यांना तक्रारदार यांच्याकडून ४०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले.