मुंबई
संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी…

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईच्या शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्या संदर्भात कोर्टाने ही सुनावणी घेतली. येत्या २४ जानेवारी रोजी या प्रकरणी कोर्टात पुढील सुनवाणी होणार आहे.
मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यास संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे.