मोटार सायकल चोरी करणारा जेरबंद…

ठाणे – मोटार सायकल चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर पोलसांनी अटक केली. मुनवर अब्दुल सलाम शेख असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, परिमंडळ १ अंतर्गत राबोडी पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना बातमीदारामार्फत पोलिसांना बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार मुनवर अब्दुल सलाम शेख याचेकडे चोरीची मोटारसायकल असून तो त्याच्या मालकीच्या दुसऱ्या मोटारसायकलचा क्रमांक चोरीच्या मोटारसायकलवर लावून स्वत: वापरत आहे. व सदरची चोरीची मोटार सायकल तो विक्रीकरीता शंकर पिठाचे गिरणी समोर, सार्वजनिक रोडवर, गौठो सोडा हातगाड़ी जवळ के. व्होला, राबोडी, ठाणे येथे येणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून मुनवर अब्दुल सलाम शेख यास मोटारसायकलसह ताब्यात घेतले. तसेच सदर मोटारसायकलबाबत तपास केला असता राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, मुनवर अब्दुल सलाम शेख यास पुढील कारवाईकरीता राबोडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.