अंमली पदार्थाची विक्री करणारे अटकेत…

ठाणे – अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे पोलीस पथकाने अटक केली. चंद्रकांतकुमार महातो आणि संडे इकेजिडे म्मडु अशी या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चिरागनगर, ठाणे येथून चंद्रकांतकुमार महातो यास मेथाक्वालोन (Methaqualone) हा अंमली पदार्थ विक्री करीता आणला असताना त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून २२ ग्रॅम वजनाचा मेथाक्वालोन हा अंमली पदार्थ व इतर वस्तू असा एकूण १,११,७०० /- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
तसेच त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने मेथाक्वालोन हा एका नायजेरीयन इसम संडे इकेजिडे म्मडु याच्याकडून खरेदी केले असल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे पोलिसांनी भाईंदर येथून संडे इकेजिडे म्मडु या नायजेरीयन नागरिकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण १६ ग्रॅम वजनाचा मेथाक्वालोन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, सदर नायजेरीयन इसमास अटक करण्यात आली आहे.