मुंबई

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात…

मुंबई – भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील माण-खटाव मतदार संघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे मुंबईहून आपल्या घराकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. साताऱ्यातील फलटणजवळून वाहणाऱ्या बाणगंगा नदीच्या पुलावरुन जात असताना गाडीला अपघात होऊन गाडी तब्बल ३० फूट दरीत कोसळली. नदीच्या पुलाचा कठडा तोडून गाडी ३० फूट खाली कोसळली. या अपघातात जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासोबत इतरही तिघेजण होते त्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

दरम्यान, गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page