कारचे म्युझिक सिस्टीम चोरी करणारी टोळी गजाआड…

विरार – महागड्या कारचे म्युझिक सिस्टीम /टेप चोरी करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा, कक्ष ३ विरार पोलिसांनी अटक केली. १) जुबेर रईस अहमद २) शहनवाज मोहम्मद अलियार खान ३) परवेज इकबाल सैय्यद अशी या तिघांची नावे आहेत.
फिर्यादी देवेंद्र खेमराज जैन यांनी त्यांची कार श्रमसाफल्य बिल्डींग, विर सावरकर रोड, भोलानाथ फर्निचर समोर, विरार पूर्व येथे पार्क केली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या कारमधील कारटेप चोरी केल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे १) जुबेर रईस अहमद २) शहनवाज मोहम्मद अलियार खान ३) परवेज इकबाल सैय्यद या तिघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून २ कार, चोरी केलेले २० म्युझिक सस्टीम / कारटेप असा एकूण १०,३२,१६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून १५ गुन्हे उघडकीस आणले.