घरफोडी करणाऱ्यास अटक; ९ गुन्हे उघडकीस…

नालासोपारा – घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारास विरार पोलिसांनी अटक करून एकूण ९ गुन्हे उघडकीस आणून, एकूण ४,८८,०४२/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. प्रथमेश शिवराम पवार असे याचे नाव आहे.

मागील काही महिन्यांमध्ये विरार पोलीस ठाणे हद्दीत दिवसा व रात्री चोरी आणि घरफोडीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढले होते. सदरबाबत विरार पोलीस ठाणे येथे चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. नमुद गुन्हयांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सदर गुन्हयांचा तपास पोलिसांनी सुरु केला. व मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नालासोपारा पूर्व येथून प्रथमेश पवार यास अटक केली.
पोलिसांनी त्याच्याकडून १) १,३२,९६२/- रु. कि. चे ३७.५० ग्रॅम वजनाची, २) १,५४,०००/- रु. कि.ची ३९.९६० ग्रॅम वजनाची व ३) ७९,५८०/- रु. कि.चे १९ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व १३ मोबाईल असा एकूण ०४,८८,०४२/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.