चैन स्नॅचींग करणारा चोरटा गजाआड…

ठाणे – चैन स्नॅचींग करणाऱ्या एका चोरट्यास नारपोली पोलिसांनी अटक करून जबरी चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणून जबरी चोरी केलेले १,०२,६०० /- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. बाकर उर्फ बाबर अक्रम अल्ली असे याचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, समिक्षा सुनिल पाटील या त्यांच्या नात्यातील २ महिला असे वसईरोडने अंजुरफाटा येथे रिक्षाने जात असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याची चैन एका मोटार सायकवरून आलेल्या दोन अनोळखी इसमापैकी मोटार सायकलवर मागे बसलेल्या इसमाने जबरीने खेचून चोरी (चैन स्नॅचिंग) करून नेलेबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दखल कऱण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे बाकर उर्फ बाबर अक्रम अल्ली यास अटक करून त्याच्याकडून गुन्हयातील जबरी चोरी केलेली १० ग्रॅम (एक तोळा) वजनाची (रूपये ५४,००० /- रूपये किंमतीचे) सोन्याची चैन हस्तगत केली. तसेच त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने नारपोली पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हा केल्याची माहिती दिल्याने सदर गुन्हयामधील चोरी केलेले ९ ग्रॅम वजनाचे (रूपये ४८,६००/- किंमतीचे) सोन्याचे गंठण असा एकूण १,०२,६०० /- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ- २, भिवंडी, योगेश चव्हाण, सहा पोलीस आयुक्त, किशोर खैरनार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मदन बल्लाळ, पोनि (गुन्हे) संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक अधिकारी पोउपनिरी रोहन शेलार, सहा पोलीस उप निरीक्षक डी.डी.पाटील, सपोउपनिरी बी एस नवले, पोहवा भगवान चव्हाण, पोहवा हरेश म्हात्रे, पोना लक्ष्मण सहारे, पोलीस नाईक सुनिल शिंदे, पोलीस शिपाई योगेश क्षिरसागर, पोशि मयुर शिरसाट, पोशि विजय ताठे यांनी केली.