घरफोडी, चोरी करणारे अटक; १३ गुन्हे उघडकीस…
घरफोडी चोरी करणाऱ्या चौघांना वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून गुन्हयातील ४,६३,१००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून एकूण १३ गुन्हे उघडकीस आणले. १) शमीम ऊर्फ राजा रमजान अन्सारी २) बालकराम ऊर्फ मुन्ना रामकिशन विश्वकर्मा ३) वलीउल्ला शफीउल्ला चौधरी ४) चाँद ऊर्फ हामीद शफीक अहमद रईन अशी या चौघांची नावे आहेत.
पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करुन सदर चौघांना अटक केली. त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी वालीव पोलीस ठाण्याचे हददीत व निर्मलनगर पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हयात चोरीस गेलेली मोटार सायकल, रोख रक्कम, कंपनीतील लोंखडी व स्टील पार्ट, सोन्याचे व चांदीचे दागिने, वाहनाच्या बॅट-या व चाके, मोबाईल असा एकूण ४,६३,१००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून एकूण १३ गुन्हे उघडकीस आणले.