छगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप; सरस्वती वक्तव्याशी आहे संबंध
चेंबूर परिसरात वास्तव्यास असलेल्या व्यावसायिकाने आपल्याला वॉट्सअप कॉल आणि संदेशाद्वारे ठार मारण्याची धकमी दिल्याप्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासह दोघांविरोधात शुक्रवारी रात्री चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
चेंबूरमधील व्यापारी ललित टेकचंदानी यांनी भुजबळ यांच्या मोबाइलवर दोन ध्वनिचित्रफिती पाठविल्या होत्या. भुजबळ यांनी महापुरुष आणि सरस्वतीबाबत केलेल्या भाषणाच्या त्या ध्वनिचित्रफिती होत्या. त्यानंतर टेकचंदानी वॉटस्अप कॉलवरून धमक्या देण्यात आल्या. तसेच त्यांना धमकीचे संदेशही पाठविण्यात आले. अज्ञात व्यक्तीने फोन करून शिवराळ भाषेत ठार मारण्याची धमकीही दिली, असे टेकचंदानी यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी भारतीय दंडसहिता कलम ५०६ अंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.