देश
व्हॉट्सअॅपची सेवा ठप्प; मेसेज जाईनात की येईनात…
व्हॉट्सअॅपची सेवा ठप्प झाली आहे. युजर्सना व्हॉट्सअॅप सेवेचा लाभ घेता येत नाहीये. मेसेज येतही नाहीत आणि जातही नाहीत. व्हॉट्सअॅप ग्रुप आणि पर्सनलवर देखील मेसेजेस पाठवता येत नसल्याचं समोर आलं आहे.
दुपारी १२. ३० वाजण्याच्या आसपास व्हॉट्सअॅपवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. दरम्यान, व्हॉट्सअॅपची मालकी असणाऱ्या मेटा कंपनीकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही.