मुंब्य्रात इमारतीचे प्लास्टर कोसळून मुलीचा मृत्यू…

thane – मुंब्र्यात एका ३० वर्ष जुन्या इमारतीमधील घराच्या छताचे प्लास्टर कोसळून एका ५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. उनेजा शेख असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून, या घटनेत तिघे जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्य्राच्या जीवनबाग परिसरात असलेल्या ५ मजली बानू टॉवरच्या बी विंगमध्ये तळमजल्यावरील घरात उमर शेख भाड्याने राहतात. शेख कुटुंबीय झोपेत असताना त्यांच्या स्वयंपाकघराच्या छताचे प्लास्टर कोसळले. त्यावेळी स्वयंपाकघरात झोपलेल्या उनेजा हिला गंभीर दुखापत झाली. तिला तात्काळ रुग्णालय दाखल करण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेत उमर शेख, मुस्कान शेख आणि एक वर्षांच्या इजान शेख या तिघांना दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.