देश

अगरताळा – लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचा अपघात!…

assam – अगरताळा – लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या एक्सप्रेसचे ८ ते १० डब्बे रेल्वे रुळावरुन घसरले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास आसाममधील डिबालोंग स्टेशनवर ही घटना घडली असून, एक्सप्रेसचे ८ ते १० डब्बे रुळावरुन घसरले.

घटनेची मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेत अद्याप कोणीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page