महाराष्ट्र

दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू…

raigad – रायगड मधील दिवेआगरच्या समुद्रात ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनर्स ॲकॅडमी या खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल दिवेआगर येथे आली होती. सर्व विद्यार्थी हे पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील एका खासगी क्लासचे विद्यार्थी होते.

पाण्याचा अंदाज न आल्याने ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हे सर्व विद्यार्थी इयत्ता अकरावी आणि बारावीचे होते. एकूण 42 विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगरच्या समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडली. त्यांना वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात आले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आणि आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे. तसेच इतर विद्यार्थी आणि शिक्षक देखील याच आरोग्य केंद्रावर असल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page