21 घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार राजेश राजभर ला गुन्हे शाखा युनिट -3 कल्याण कडून 38,50000/- सोने चांदीचे मुद्देमालासह अटक…

kalyan – नवी मुंबई, पालघर, ठाणे ग्रामीण क्षेत्रात घरफोडी चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्यास कल्याण गुन्हे शाखा घटक ३ पोलिसांनी अटक करून ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला तसेच २१ गुन्हे उघडकीस आणले. राजेश राजभर असे याचे नाव असून पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश राज्यातील आजमगढ येथून अटक केली. राजेश कुंभारखान पाडा डोंबिवली पश्चिम येथे राहतो त्याचे मूळ गाव उत्तर प्रदेश राज्यातील आजमगढ हे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवली (प.) गु.र..नं. १५९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) या गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा, घटक ३ कल्याण पोलिसांकडून करण्यात येत होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे राजेश राजभर याला उत्तर प्रदेश राज्यातील आजमगढ येथून अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने नवी मुंबई, पालघर, ठाणे ग्रामीण क्षेत्रात घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याचे सांगितले. आणि चोरी केलेले दागिने, रोख रक्कम पहिली पत्नी आणि भाऊ राकेश याच्याकडे ठेवले असल्याचे सांगितले.
सदर प्रकरणी राजेशची पत्नी आणि भावाकडून घरफोडी चोरीतील २५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि २८,०००/- रूपये रोख रक्कम असा एकूण ३८,५०,०००/- रूपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दरम्यान राजेशवर यापूर्वी ठाणे, ठाणे ग्रामीण आणि रायगड अशा विविध ठिकणी एकूण ३३ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे, पंजाबराव उगले, पोलीस सह आयुक्त, गुन्हे, ठाणे, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे व शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध १, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहा.पो.निरी. सर्जेराव पाटील, सहा. पो निरी. बळवंत भराडे, पोउपनिरी किरण भिसे, सहा.पो.उप निरी. दत्ताराम भोसले, सहा.पो.उप निरी. बालाजी शिंदे, पोहवा/विजय जिरे, पोहवा/ पांडुरंग भांगरे, पोहवा/सुधीर कदम, पोहवा/सचिन भालेराव, पोहवा/विलास कडु, पोहवा / सचिन कदम, पोहवा/आदिक जाधव, पोहवा/गोरक्षनाथ पोटे, पोहवा/प्रशांत वानखेडे, पोहवा/उल्हास खंडारे, पोना/दिपक महाजन पोना/प्रविण किनरे, पोशि/ गुरूनाथ जरग, पोशि/मिथुन राठोड, पोशि/विनोद चन्ने, पोशि/गणेश हरणे, पोशि/गोरक्ष शेकडे, पोशि/जालिदंर साळुंखे पोशि/सतिश सोनावणे व म.पो.शि. / मंगल गावित, चालक सहा.पो.उप निरी. बोरकर, सर्व नेम. गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण यांनी केलेली आहे.



