kalyan

कल्याण पूर्वेत गोळीबार; सहा जणांना अटक…

kalyan – कल्याण पूर्वेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर कोळसेवाडी पोलिसांनी सहा जणांना अटक करून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार, प्रेम अजय सिंग ऊर्फ गुंडा याच्या स्कॉर्पिओला सुदर्शन संजीव निकाळे याच्या स्कुटीने कट मारल्यावरून प्रेम अजय सिंग उर्फ गुंडा व सुदर्शन संजीव निकाळे उर्फ बुंदी या दोन गटात कल्याण पूर्वेतील तुलसा पार्क बिल्डींगसमोर मारामारी होऊन प्रेम गुंडा याचे गटातील ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानू रमेश राठोड याने गावठी पिस्टलने फायरिंग केल्याने भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या राहुल वर्मा याला गोळी लागून तो जखमी झाला.

सदर घटनेच्या अनुषंगाने ऐकमेकांविरूध्द दिलेल्या तक्रारी वरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी प्रेम अजय सिंग उर्फ गुंडा, ओंकार धोंडीराम जगदाळे, सुदर्शन संजीव निकाळे उर्फ बुंदी, संजय शर्मा, कार्तिक पवार, पवन चव्हाण या सहा जणांना अटक करून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळावरून १ गावठी पिस्टल जप्त केले. दरम्यान जखमी राहुल वर्मा याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, अतुल झेंडे, सपोआ कल्याण अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनात वरीष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी पो स्टे हेमंत गुरव गुन्हयाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page