भिवंडी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त एसीबीच्या जाळ्यात…

thane – भिवंडी महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
सुरेंद्र भोईर असे या सहाय्यक आयुक्ताचे नाव असून, अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना एसीबीने रंगेहात पकडले. भोईर हे प्रभाग समिती क्रमांक ३ चे प्रभारी सहाय्यक आयुक्त आहेत. भोईर यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती.

माहितीनुसार प्रभाग समिती क्रमांक ३ अंतर्गत अनधिकृत बांधकाम सुरू होते. त्यावर कारवाई न करण्यासाठी सुरेंद्र भोईर यांनी ५ लाखांची मागणी केली होती. ५ लाखांमधील पहिला हफ्ता म्हणून अडीच लाख देण्याचे देण्याची मागणी सहाय्यक आयुक्तांनी केली.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागास या संदर्भात तक्रार मिळाल्यानंतर एसीबीने सापळा रचून प्रभाग समिती कार्यालयाबाहेर मोकळ्या मैदानात सुरेंद्र भोईर यांना अडीच लाख रुपये लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडले.



