देश

NEET 2026 ची परीक्षा रद्द…

New delhi – वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

नीट यूजी 2026 चा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) केंद्र सरकारच्या परवानगीनंतर नीट यूजीची परीक्षा रद्द केली.

ही परीक्षा 3 मे 2026 रोजी घेण्यात आली होती. देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, देशभरात 42 तास अगोदरच या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने पेपर फुटला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून हि परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही परीक्षा आता नव्याने घेण्यात येणार असून त्याची तारीख लवकर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) म्हणजेच राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page