महाराष्ट्र

कौटुंबिक वादातून तरुणावर चाकू हल्ला…

Ulhasnagar – कौटुंबिक वादातून एका तरुणावर चाकू हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मेव्हण्याने बहिणीच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. नागेश चव्हाण असे बहिणीच्या नवऱ्याचे नाव आहे तर शकील खान असे मेव्हण्याचे नाव आहे.

नागेश चव्हाण कामावरून घरी जाताना त्याचा मेव्हणा शकील खान हा अरबाज खानसह तेथे आला. आणि त्याने नागेशच्या पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर नागेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी शकील खान आणि अरबाज खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page