kalyan

१०७ किलो गांजासह तिघांना अटक…

kalyan – कल्याणमध्ये १०७ किलो गांजासह तिघांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने हि कारवाई केली असून, २१,४०,०००/- गांजाची किंमत असून, एकूण २१,९१,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वसिम नुरूजमा खान उर्फ पिला, दिनेशकुमार सजीवर सरोज आणि मोहित मेवालाल वर्मा अशी तिघांची नावे आहेत.

खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे, डिलर व अभिलेखावरील पाहिजे/फरारी आरोपीतांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी कल्याण पश्चिमेतील वाडेघर, डम्पिंग ग्राउंडजवळ, सावर्जनिक रोडच्या कडेला आले असता तीन जण संशयितरित्या आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ १०७ किलो गांजा, रोख रक्कम आणि ३ मोबाईल मिळून आले.

सदर प्रकरणी २१,९१,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघांनविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी परिमंडळ ३ कल्याण विशेष कारवाई पथक व खडकपाडा पोलीस ठाणे पथकातील सपोनि/अनिल गायकवाड, ग्रेड पोलीस उप निरीक्षक/जितेंद्र ठोके, पो.हवा. देवरे, पो.शि राहुल शिंदे, पो.शि. अमित शिंदे, पोशि बिरपन, पोशि खांडेकर आणि पो. शि खरसाण यांनी संयुक्तपणे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page