kalyan

dombivali : महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन; लिपिक भूषण पाटील निलंबित…

dombivali – महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणारा डोंबिवली १० ई वार्डमध्ये कार्यरत असलेला लिपिक भूषण पाटील याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी हि कारवाई केली आहे.

एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी भूषण पाटील याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, याची दखल घेत आयुक्तांनी हि कारवाई केली.

भूषण पाटील हा कल्याण डोंबिवली महापालिकेतील १० ई वार्डमध्ये कंत्राट पद्धतीने कामावर होता.

दरम्यान, भूषण पाटील याचे निलंबन काळात ०१/अ. प्रभागक्षेत्र कार्यालय, कडोंमपा हे मुख्यालय राहील आणि वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाटील याला मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच निलंबित असताना खाजगी नोकरी किंवा धंदा करणे अनुज्ञेय असणार नाही. आणि निलंबन काळात निर्वाह भत्ता मिळणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page