डोंबिवली

आरोपीला पाठीशी घालणारे मानपाडा वपोनि संदीपान शिंदे यांना निलंबित करण्याची मागणी…

dombivali – डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी लक्ष्मण हजारे, युवराज सुर्ले यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री सचिवालय, पोलीस महासंचालक, ठाणे आयुक्त, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ कल्याण आणि कल्याण फौजदारी वकील संघटनेचे अध्यक्ष यांना पत्र दिले आहे.

मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक अवैध धंदे चालू आहेत अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे, बार, स्पा सेंटरच्या नावाखाली देहविकी केंद्र, लॉजींग, बोर्डिंग, गांजा, दारूचे अड्डे इत्यादीची विक्री जोरात चालू आहे. यावर कोणतीही कारवाई संदीपान शिंदे करत नाहीत याउलट जी व्यक्ती यासंदर्भात तक्रार करते तिच्याविरुद्ध खंडणी, बलात्कार, विनयभंग असे खोटे गुन्हे दाखल केले जातात. असे दिलेल्या पत्रात म्हण्टले आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी मानपाडा पोलीस ठाण्यात कडोंमपा पालिका १०ई प्रभाग क्षेत्र कार्यालयात काम करणारा लिपिक भूषण पाटील याने महिला कर्मचाऱ्याला शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजूनही पाटील याला पोलिसांनी अटक केलेली नाही.

भुषण पाटील यांचा भाऊ एका मोठ्या राजकीय नेत्याच्या घरी कामाला असल्याची माहिती मिळते व त्या राजकीय नेत्याच्या पी.ए.ने मानपाडा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या वरती दबाव आणल्याचे समजते. म्हणूनच शिंदे यांनी पाटील याला अजून अटक केली नसावी असा संशय निर्माण झाला आहे.

त्यामुळे संदीपान शिंदे यांचा मोबाईल जप्त करून सी.डी.आर तपासावा आणि त्यांचा कोणाशी संबंध आहे? हे बघावे अशी देखील मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

kdmc आयुक्तांनी भूषण पाटील यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून निलंबित केले आहे. परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे हे आरोपींना पाठीशी घालत आहेत. इतका गंभीर गुन्हा असूनही आरोपीला मोकाट सोडलेले आहे. अजूनही पाटील याला पोलिसांनी अटक केलेली नाही.

त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page