२२.२७१ किलो गांजासह दोघांना अटक…

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोकण कृती विभागाची कारवाई…
kalyan – कल्याण पश्चिमेत गांजा या अंमली पदार्थासह ओडीसा राज्यातील दोघांना अटक करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोकण कृती विभागाने हि धडक कारवाई केली असून, या कारवाईत एकूण २२.२७१ किलो गांजा (किंमत ४,४५,४२०/- रुपये) जप्त करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेतील बैल बाजार वैकुंठ धाम स्मशान भूमी समोर पोलिसांना दोन जण संशयास्पदरित्या आढळून आले. झडती घेतली असता त्यांच्याजवळ एकूण २२.२७१ किलो गांजा (किंमत ४,४५,४२०/- रुपये) गांजा मिळून आला. तसेच गिरोधारी देव्हारी आणि ईशम्भूशाहू साहू अशी त्या दोघांनी नावे सांगितली. सदर प्रकरणी गांजा जप्त करण्यात आला असून, या दोघांविरुद्ध महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२२३/२०२५ एन.डी.पी.एस. अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २०१६) २९ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दोघांना अटक करण्यात आली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी अंमली पदार्थ विरोधी टास्क फार्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक, प्रविण पाटील, पोलीस अधिक्षक, मकानदार, अपर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक रामचंद्र मोहिते, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गावशेते, सपोनि उमेश भोसले, सपोनि यु.आर. काळे, पोउपनिरी. नरे, पोहवा अनिल मोरे, पोहवा लिलाधर सोळंकी, पोहवा मगरे, पोहा जितेंद्र कांबळे, पोहचा सतीश सरफरे, पोहवा रॉड्रीग्ज, पोहवा चव्हाण, पोशि प्रमोद जमदाडे, पोशि भोईर, मपशि/पादोर, कोल्हे यांनी केली.



