भिवंडीत गावठी दारूचा साठा जप्त…

thane – भिवंडीत हातभट्टी दारूचा साठा जप्त करून एकास अटक करण्यात आली आहे. भिवंडी गुन्हे शाखा, घटक २ च्या पोलिसांनी कारवाई केली असून, यात पोलिसांनी १ लाख रुपयांची, १,११५ लिटर हातभट्टीची तयार दारू जप्त केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रुपेश पाटील असे आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अलीमघर परिसरात राहणाऱ्या रुपेश पाटीलच्या राहत्या घराशेजारील खोलीमध्ये छापा टाकला आणि एकूण १ लाख ११ हजार ५०० रुपये किंमतीची १,११५ लिटर हातभट्टीची तयार दारू जप्त केली. तसेच सदर प्रकरणी नारपोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ।१३०७/२०२५, दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
सदरची यशस्वी कामगिरी अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक/जनार्दन सोनवणे, सपोनि/मिथुन भोईर, पोउनि/रामचंद्र जाधव, पोउनि/रविंद्र बी. पाटील, पोहवा/ किशोर थोरात, पोहवा/ प्रकाश पाटील, पोहवा / शशिकांत यादव, पोहवा/ निलेश बोरसे व पोअं/ सर्फराज तडवी यांनी केली.



