मुंबई
महसूल विभागात डिजिटल क्रांती!…

mumbai – राज्यातील महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. डिजिटल 7/12 उताऱ्याला अखेर राज्य सरकारने कायदेशीर मान्यता दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढत डिजिटल सातबारा, 8-अ आणि फेरफार उतारे आता पूर्णपणे वैध मानण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी राज्य सरकारने अधिकृत परिपत्रकही जारी केले आहे.

या निर्णयामुळे:
- डिजिटल ७/१२ ला अधिकृत मान्यता
- फक्त रु. १५ मध्ये अधिकृत उतारा उपलब्ध
- तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची गरज संपली
- डिजिटल स्वाक्षरी, QR कोड, आणि 16 अंकी पडताळणी क्रमांक असलेले ७/१२, ८-अ व फेरफार उतारे
- सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग व न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध असणार.



