मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई; १ कोटी १० लाखांचे चरस जप्त…

mumbra – अंमली पदार्थ विक्री करणा-या गुन्हेगारास मुंब्रा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून २ किलो (किंमत एक करोड दहा लाख पंचवीस हजार) चरस जप्त केला आहे. मोहम्मद हारून हसरत अली सिद्धीकी असे याचे नाव आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाची विक्री व सेवन करण्याचे प्रमाण वाढले असून, त्या अनुषंगाने वरिष्ठ. पो.निरी. अनिल शिंदे यांनी पोलीस स्टेशनचे एन.डी.पी.एस पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अंमली पदार्थ विक्री व सेवन करणा-या इसमांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुषंगाने पोलीस पथक मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना कौसा काळसेकर परिसरातील, ऐरोली-मुंब्रा ब्रिजबोगद्याजवळ, निर्जन ठिकाणी संशयितरित्या एक इसम मिळून आला तो पळून जाऊ लागल्याने त्याचा पाठलाग करून पोलिसांना त्याला पकडले आणि त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ २ किलो २०५ ग्रॅम (चरस) अंदाजे किंमत १,१०,२५,०००/- (एक करोड दहा लाख पंचवीस हजार) (व्यापारी मात्रा असलेला) अंमली पदार्थ मिळून आला तसेच त्याने त्याचे नाव मोहम्मद हारून हसरत अली सिद्धीकी असे सांगितले. त्याला अटक करण्यात आली असून, चरस जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी त्याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गु.र.क. ॥ १९८८/२०२५ एन.डी.पी.एस ऍक्ट कलम ८ (क), २०(ब) ॥ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने दि.०८/१२/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
मोहम्मद हाऊन हसरत अली सिध्दीकी जम्मू-काश्मीर राज्यातून अंमली पदार्थ विक्रीकरिता घेऊन आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच हा चरस ठाणे परिसरात विक्री करीत होता. मोहम्मदवर अजमेर, राजस्थान येथे गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, मुंब्रा पोलीस ठाणे एन.डी.पी. एस पथकाने एन.डी.पी. एस कारवाईचा धडाका कायम ठेवत आज पर्यंत ३२४ सेवन करणा-यांवर व २७ ताबा कारवाई करण्यात आलेल्या आहेत या ताबा कारवाईदरम्यान एकूण ३,४१,०५०००/- किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात यश आलेले आहे. एन. डी.पी.एस पथकाचे मार्फतीने अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणा-या इसमांवर यापुढे देखील अशाचप्रकारे कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त परिमंडळ ०१ सुभाष बुरसे, सहा. पोलीस आयुक्त, कळवा विभाग प्रिया हमाले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (प्रशासन) नितीन पगार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार, पोलीस निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) राजु पाचोरकर, सपोनि/रोहीत केदार, सपोनि/गणेश जाधव, पोशि/ निलेश वर्षे, पोशि/नवनाथ तेलंगे, पोशि/सचिन पाटील, पोशि/ सागर महांगडे,, पोशि/ वसीम तहवी, पोशि/सागर सपकाळे यांनी केली आहे.



