कल्याण : १७ गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई…

kalyan – अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १७ गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात असलेल्या दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणात या गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) लावण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील पहिलीच मोठी हि कारवाई आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडकपाडा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (क), २९ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने राज्यातील तसेच राज्याबाहेरील विवीध भागातून एकूण १३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथून आरोपीकडून एकूण ६२ किलो ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, १ लोखंडी धातुचे पिस्टल, २ जिवंत काडतुस व २ वॉकीटॉक संच चार्जरसह जप्त करण्यात आले आहे.
तसेच अटक केलेल्या १३ आरोपींकडून एकूण ११५ किलोग्रॅम गांजा, गांजा वाहतुकी करीता वापरण्यात आलेली २ मोटार कार, १ बुलेट मोटार सायकल, १ ऑटो रिक्षा, १ मोटार सायकल, १ लोखंडी धातुची पिस्तुल, २ जिवंत काडतुस, २ वॉकी टॉकी संच चार्जरसह असा एकूण सुमारे ७० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयाच्या तपासात ४ पाहिजे आरोपीतांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांचा शोध सुरू आहे.
गुफरान हन्नान शेख हा टोळीचा प्रमुख असून, इतर सोळा जण त्याचे साथीदार आहेत. त्यांची नावे बाबा उस्मान शेख, सुनील मोहन राठोड, आझाद अब्दुल शेख, रेश्मा अल्लाद्दीन शेख, शुभम शरद भंडार, असिफ शेख, सोनु हबीब शेख, प्रथमेश हरिदास नलावडे, अंबादास नवनाथ खामकर, आकाश बाळू भिताडे, योगेश दत्तात्रय जोध अशी असून, इतर चार फरार आरोपी आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, ठाणे आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त परि.०३ अतुल झेडे यांच्या सुचनेप्रमाणे करण्यात आली असून, सदर गुन्हयाचा पुढील तपास कल्याणजी घेटे, सहा पोलीस आयुक्त, कल्याण हे करत आहेत.