डोंबिवलीत भर रस्त्यात चाकू हल्ला…

dombivali – डोंबिवली पूर्वेत भर रस्त्यात दोघांनी एकमेकांवर चाकूने हल्ला करत मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे. पगाराच्या वादातून हा हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील नांदिवली परिसरात हि घटना घडली. मिनी व्हॅन मालक आणि ड्रायव्हर यांच्यात पगार न दिल्यामुळे वाद झाला. पगार न दिल्यामुळे मिनी व्हॅनच्या ड्रायव्हरने थेट मालकाच्या पोटामध्ये चाकू खुपसला. दोघांनीही एकमेकांवर वादा दरम्यान चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
दरम्यान, मालक हा शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी असून एकता रिक्षा – टॅक्सी चालक – मालक सेनेचा अध्यक्ष आहे.