डोंबिवलीत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

dombivali – डोंबिवलीत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकेश शिवयश चौबे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, याबाबत संबंधित ४५ वर्षीय महिलेने राम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
श्रीकेश चौबे याच्यावर बी.एन.एस. कलम ७४, ७५, ११५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला डोंबिवली पूर्वेतील नेहरू रोड, भाजी मार्केट येथून जात असताना श्रीकेश चौबे याने तिचा विनयभंग करत तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने आरडाओरडा केला असता, त्याठिकाणी असलेल्या लोकांनी श्रीकेश चौबे याला पकडले आणि त्याला राम नगर पोलीस ठाण्यात घेऊन आले.
दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.