वाहन चोरी करणारे गजाआड; २८ वाहने हस्तगत…

thane – वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करुन २८ मोटार सायकल हस्तगत करुन २६ गुन्हे उघडकीस आणण्यास गुन्हे शाखेस यश आले आहे. अतुल सुरेश खंडाळे (खंडागळे), शेखर गोवर्धन पवार, आकाश मच्छिंद्र नसरगंध, गाझी लकीर हुसैन आणि मुश्ताक इस्तीयाक अंसारी अशी यांची नावे असून, गुन्हे शाखा, घटक २, भिवंडी आणि घटक ३, कल्याण पोलिसांनी हि कारवाई केली आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार वाहन चोरीचे गुन्हे घडले होते, सदर गुन्हयांचा गुन्हे शाखा, घटक २, भिवंडी आणि घटक ३, कल्याण पोलिसांकडून समांतर तपास करण्यात येत होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा कल्याण पोलिसांनी अतुल सुरेश खंडाळे (खंडागळे), शेखर गोवर्धन पवार, आकाश मच्छिंद्र नसरगंध, गाझी लकीर हुसैन या चौघांना अटक केली तर मुश्ताक इस्तीयाक अंसारी याला गुन्हे शाखा भिवंडी पोलिसांनी अटक केली.
सदर प्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून चारचाकी, दुचाकी अशी एकूण २८ वाहने (१७,८९,८९९/- रु. किंमत) हस्तगत केली असून, ठाणे, मुंबई, नवी मुंबई ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण २६ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर व शेखर बागडे सहा.पो.आयुक्त गुन्हे शोध -१, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक २ भिवंडीचे वपोनिरी जनार्दन सोनवणे, घटक-३, कल्याणचे वपोनिरी अजित शिंदे तसेच गुन्हे शाखेचे सपोनि/श्रीराज माळी, सपोनि/मिथुन भोईर, सपोनि/सर्जेराव पाटील, सपोनि/बळवंत भराडे, पोउनि/रविंद्र बी. पाटील, पोउपनि/किरण भिसे, पोउपनि/विनोद पाटील, सपोउनि/सुनिल साळुंके, सपोउनि/सुधाकर चौधरी, सपोउनि/दत्ताराम भोसले, पोहवा/निलेश बोरसे, पोहवा/साबीर शेख, पोहवा/रंगनाथ पाटील, पोहवा/किशोर थोरात, पोहवा/प्रशांत राणे, पोहवा/सुदेश घाग, पोहवा/राजेश गावडे, पोहवा/प्रकाश पाटील, पोहवा/शशिकांत यादव, पोहवा/वामन भोईर, पोहवा/बालाजी शिंदे, पोहवा/अदिक जाधव पोहवा/सुधीर कदम, पोहवा/सचिन भालेराव, पोहवा पांडुरंग भांगरे, पोहवा/सचिन कदम, पोहवा/विजय जिरे, पोहवा/विलास कडु, पोहवा/गोरखनाथ पोटे, पोहवा /प्रशात वानखेडे, पोहवा/उल्हास खंडारे, पोहवा/दिपक महाजन, पोना/प्रविण किनरे, पोशि/गुरूनाथ जरग, पोशि/विनोद चन्ने, पोशि/मिथुन राठोड, पोशि/गोरक्ष शेकडे, पोशि/सतिश सोनवणे, पोशि/गणेश हरणे, पोशि/जालिदंर साळुंखे, पोशि/नितीन नंदीवाले, मपोहवा/माया डोंगरे, मपोहवा/अनुष्का पाटील मपोहवा/ज्योत्स्ना कुंभारे, मपोहवा / मंगल गावित, चालक अमोल बोरकर यांनी केली.